Type Here to Get Search Results !

ढाणकी येथे वादळी वाऱ्यासह गारपीट शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान




ढाणकी येथे वादळी वाऱ्यासह गारपीट 


ढाणकी प्रतिनिधी,दिगांबर शिरडकर.


ढाणकी येथे वादळी वारे व गारासह पाऊस झाला असून रब्बी हंगामाची पुरती वाट लागली आहे. सलग पंधरा ते वीस मिनिट पाऊस,वादळी वारे, व गारपीटी मुळे गहू पिकाचे अतोनात नुकसान झाले.गहू अक्षरशः जमिनीवर पडला असून हाती काही लागेल न लागेल याची सुध्दा शास्वती नाही. तसेच काही शेतकऱ्यांचे हरभरा पिकांचे ढिग लागलेले होते. प्रचंड वारा असल्यामुळे ढिगावरील ताडपत्र्या सुध्दा राहिल्या नाही.त्यामुळे ढिगात पाणी शिरले गेले तर काहींचे हरभरा काढण्याची लगबग यातच मशीन खाली बिछायत ,सोबतच झालेल्या चण्याच्या पोत्यावर, कुणाच्या राशीवर तर कुणाच्या ढिगावर ताडपत्री यामुळे ताडपत्री झाकणार तरी कुठे या धावपळी मध्ये शेतकऱ्यांची फार तारांबळ उडाली.कुणाचा काढलेला हरबरा,सुध्दा पाण्याने भिजला गेला.तीळ या पिकाचे गारामुळे पान सुध्दा शिल्लक राहिली नाही. ढाणकी सोबतच आजू बाजूच्या परिसरात गांजेगव, सोईट,बीटरगाव, मेट,महागाव कृष्णापुर ई.ठिकाणी वादळी वारे, गारपीटी सह पाऊस झाला .यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. आणखी किती दिवस असे वातावरण राहणार ही शेतकऱ्याला धास्ती वाटत आहे. त्यामुळे त्वरित पंचनामा करून झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी .अशी मागणी शेतकऱ्याच्या वतीने होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad