अफूची शेती करणारा घोडेगाव पोलिसांच्या ताब्यात, 8 दिवसांत घोडेगाव पोलिसांची दुसरी कारवाई
घोडेगाव, ता. १८: गंगापूर बु. (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील हरिभाऊ रामा मधे या ७२ वर्षीय इसमाने संत यांच्या शेतामध्ये विनापरवाना अफूच्या झाडांची लागवड केल्याचे समजताच घोडेगाव पोलिसांनी शेतात जाऊन मुद्देमालासह हरिभाऊ मधे यांना ताब्यात घेतले आहे.
गंगापूर बू (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील हरिभाऊ रामा मधे या ७२ वर्षीय इसमाने संत यांच्या शेतात अफूची झाडे लावली असल्याचे घोडेगाव पोलिसांना समजतच, घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या नेतृत्वातील पथकाने संत यांच्या शेतात जाऊन पाहणी केली असता, शेतात तब्बल ३७.५४ किलो वजनाची १.८८ लाख रुपये किंमतीची अफूची बोंडे आढळून आल्याने हरिभाऊ रामा मधे यांच्यावर एन.डी.पी.एस. ॲक्टच्या ८(ब), १५(ब) आणि १८(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची कायदेशीर फिर्याद घोडेगाव पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अनिल चव्हाण यांनी दिली असून पुढील तपास घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक के.एच. वागज करत आहेत. घोडेगाव पोलिसांनी केलेल्या या दमदार कामगिरीबद्दल घोडेगाव आणि परिसरातील नागरिक घोडेगाव पोलिसांचे कौतुक करत असून आंबेगाव तालुक्यातील कालीन भैय्या गजाआड झाल्याने समाधान व्यक्त करत आहेत.
प्रतिनिधी - आकाश भालेराव घोडेगाव