पंढरपूर | इसबावी मोटर चालू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू
पंढरपूर तालुक्यातील इसबावी येथे मोटर चालू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शेतकरी विनायक पाटील असे चंद्रभागा नदीत बुडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
पंढरपूर शहरापासून वाहणाऱ्या भीमा नदी पात्राजवळ विनायक पाटील यांची शेती आहे. विनायक पाटील हे शेतात मोटर चालू करण्यासाठी गेले होते मात्र अचानक पाय घसरल्यामुळे ते भीमा नदीत पडले. भीमा नदीत पात्रात पाण्याचा अंदाज ण आल्यामुळे विनायक पाटील यांचा बुडून मृत्यू झाला.