शिंदे-फडणवीस महाडाकू, तुम्ही त्यांच्यासोबत गेलात! वृद्ध शेतकऱ्याने बच्चू कडूंना खडसावले
जेथे जाऊ तिथे लोक गद्दार म्हणतात.
लग्नकार्यात गेले तरी गद्दार आले म्हणून लोक हिणवतात, हे वाक्य तंतोतंत आपल्यालाच लागू पडेल, असे आमदार बच्चू कडू यांना स्वप्नातही वाटले नसेल! धाराशिव येथील न्यायमंदिराच्या आवारातच एका वृद्ध शेतकऱ्याने 'शिंदे-फडणवीस महाडाकू आहेत, तुम्ही त्यांच्यासोबत गेलात! तुम्ही गद्दार आहात, यासाठीच तुम्हाला निवडून दिले होते का', असा सवाल केला.