महाराष्ट्र भुषण तिर्थ.डॉ श्री नाना साहेब धर्माधिकारी यांच्या जन्म दिनानिमित्त जव्हार शहरात महास्वच्छता मोहिम
जव्हार प्रतिनिधी:- सुनिल जाबर
जव्हार-१ मार्च हा महाराष्ट्र भुषण तिर्थ. डॉ. श्री. नाना साहेब धर्माधिकारी यांचा जन्म दिवस यावर्षी जन्म शताब्दी निमित्ताने संपुर्ण भारत भर "महा स्वच्छता अभियान" म्हणून साजरा केला जात आहे. यावेळी शहरी भागा तील व खेडयातील श्री सदस्यांनी एकत्र येऊन हातात खराटा, फावडा, टिकाव, पंजा घेऊन जव्हार शहरातील विविध शासकीय कार्यालय यात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय, प्रकल्प कार्यालय, तहसिल कार्यालय, नगर पालिका, दवाखाना, न्यायालय, तलाठी कार्यालय, पंचायत सामिती इ. विविध कार्यालयातील सर्व परिसराची स्वच्छता केली. ज्यावेळी सकाळी कार्यालय उघडली तेव्हा सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अश्चर्य व्यक्त केले.
एका दिवसात इतकी स्वच्छता झाली कशी.? महाराष्ट्र भूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंड़ा यांच्या उपस्थित श्री सदस्यांनी स्वच्छतेचे सर्व नियम पाळून महास्वच्छता अभियान यशस्वी करण्यात आले. जवळ पास २५० श्री सदस्यांमार्फत हि स्वच्छता करण्यात आली. जवळपास २०,९०० चौ.मी. क्षेत्रफळात सफाई करण्यात आली.
स्वच्छता करतांना ३ ट्रेक्टर, १०१ झाडू, ८ टोपले, १० कोयते, ३० पंजा, ४ फावडे, ४ विळे
इ. साहित्याचा वापर करण्यात आले होते. ८ टन सुका कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली तसेच ट्रॅक्टरच्या १४ फेऱ्या करण्यात आल्या. या वेळी नगर परिषद जव्हारच्या वतीने सहकार्य मिळाले आहे.