एस. के. डी. विद्यालय भावडे येथे डॉ. मंजिरी आहेर यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
एस. के. डी. चारिटेबल ट्रस्ट नासिक संचलित एस. के. डी. इंटरनॅशनल स्कूल व व्ही.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भावडे. येथे 28 फेब्रुवारी रोजी विज्ञान दिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी मंचावर प्रमुख अतिथी डॉ. मंजिरी आहेर उपस्थित होत्या, प्रमुख अतिथी डॉ. मंजिरी आहेर, संस्थेच्या सेक्रेटरी मीना देवरे, प्राचार्य पाटील एस. एन. पर्यवेक्षक पवार एस. जे , प्राथमिक विभाग प्रमुख शोभा जाधव यांनी डॉ. अब्दुल कलाम व देवी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन , दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सेक्रेटरी मीना देवरे यांच्या हस्ते प्रमुख अतिथींचे हार पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रसंगी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महानवैज्ञानिकांच्या वेशभूषा परिधान करून विद्यालयाच्या शिक्षकांच्या वतीने त्यांचा वृक्षाचे रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या वतीने विज्ञानावर आधारित एकांकिका, नृत्य सादर करण्यात आले. सदर कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली. विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शन व विज्ञानावर आधारित रांगोळी प्रदर्शनाचे प्रमुख अतिथींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान प्रमुख अतिथींच्या हस्ते शाळेच्या विविध स्पर्धांमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या शिक्षका नूतन सैंदाणे व गंगासागर जाधव यांनी सूत्रसंचालन केले. विज्ञान प्रदर्शनासाठी विद्यालयाच्या विज्ञान शिक्षिका भाग्यश्री जाधव, सविता नेरकर, गायत्री बोरसे, प्रियंका सावकार, पियुषा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या शिक्षिका अर्चना महाजन शिक्षकेतर कर्मचारी बबलू देवरे, सागर कैलास यांनी प्रयत्न केले. यशस्वीरित्या पार पडलेल्या कार्यक्रमासाठी व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे यांनी अभिनंदन केले.