सोरापाडा येथून मोटर सायकल लंपास पोलिसात गुन्ह दाखल
अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथून याहमोही मोबाईल ॲक्सेसरीज आणि रिपेरिंग च्या दुकानासमोर लावलेली मोटर सायकल एका अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या संदर्भात अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोरापाडा येथील याहामोगी मोबाईल असेसरीज आणि रिपेरिंग दुकानाच्या समोर सार्वजनिक जागी विश्वास विजयभाई गावित यांची 30 हजार रु किमतीची जी जे २६ के २९३१ क्रमांकाची मोटर सायकल दिनांक 23 फेब्रुवारी रोजी उभी केली होती सदर मोटरसायकल सुमारे चार वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेली म्हणून विश्वास विजयभाई गावित रा. परोड तालुका कुकरमंडा यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गोविंद जाधव हे करीत आहेत