क्रुझर पलटी अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 50 जण जखमी
रस्त्याच्या उतारावरून नाल्यात जाऊन पलटी होऊन क्रुझर गाडीचा झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर तीन जणांचा रुग्णालयात मृत्यु झाला तसेच या घटनेत तब्बल 50 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.सदर घटना भराडी पादर कडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली याबाबत पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, GJ 16 Z 5201 च्या क्रुझर वाहनात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन वाहन वेगाने चालवून घेऊन जात असताना सदर वाहन भराडीपादर गावाच्या उतारा वरून रस्त्याच्या खाली नाल्यात पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दिनेश हात्या वसावे वय १० वर्ष, विलास रमेश पाडवी (वय १३ वर्ष) विलास राज्या वसावे ( वय १४ वर्ष) तिन्ही रा.कंटासखाई ता अक्कलकुवा, तसेच दिनेश बिज्या वसावे रा.कोठली यांचा मृत्यू झाला.
तर या अपघातात रंजिता सिपा पाडवी सिपा काल्या पाडवी, शैलेश दमन्या पाडवी, अनसिबाई भीमसिंग वसावे, कालू दिवल्या पाडवी, महेश नरसिंग पाडवी, निर्मला दमन्या पाडवी, पूर्वी दमन्या पाडवी, मुन्नी हण्या वसावे, निकिता पुण्या पाडवी, केजल लालसिंग वसावे, सुरेश नरसिंग वसावे, दिनेश बिजा वसावे राहणार कुठली तालुका मसरा बामण्या पाडवी, अनिष्का हाल्या पाडवी, हात्या दिवल्या पाडवी, रेवली जेठ्या वसावे, जेठ्या दिवल्या पाडवी,
सेवा रेहमा पाडवी , पुण्या ओल्या पाडवी, सुरेश नरसी वसावे, शांतीबाई वाहऱ्या वसावे, सिपा खादऱ्या पाडवी, रितेश डाला वसावे, विलास रमेश पाडवी, विकास राला वसावे, जेवली जेठ्या वसावे, रवींद्र, केजल नरसिंग वसावे रा.करासखाई ता अक्कलकुवा, मांगा जालमा वसावे गणेश ओल्या वसावे, मुन्नी दाखल्या वसावे, संजय रायज्या वसावे, मागा जालमा वसावे, प्रदीप मांगा वसावे, कविता वनसिंग वसावे, गणेश ओल्या वसावे, मुन्नी दातक्या राऊत, संजय रायज्या वसावे दातक्या सपा राऊत, किसन बाबा पाडवी, अमरसिंग विज्या वसावे, लालसिंग विज्या वसावे राहणार सर्व रा.कुवा तालुका अक्कलकुवा खोली रोश्या वसावे ओली राज्या वसावे रा. मोगरा तालुका अक्कलकुवा दिनेश ढाल्या वसावे रा. ओढी ता.अक्कलकुवा स्वाती मुनेश पाडवी रा. रतन पाडा तालुका अक्कलकुवा हे जखमी झाले आहेत याबाबत अक्कलकुवा पोलिसात अमरसिंग बीज्या वसावे यांनी फिर्याद दिल्यावरून अक्कलकुवा पोलिसात गाडी चालक वेस्ता दिवल्या वसावे राहणार कटासखाई याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ६५/ २०२३ भादवी कलम ३०४,२७९,३३७,३३८, ४२७ मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४,१८७,६६/१९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक रितेश राऊत करीत आहेत.
सदर अपघातात एक जण जागीच तर दोन जणांचा अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात मृत्यु झाला तर एक जण जिल्हा रुग्णालयात मृत्यूमुखी झाला.
या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक राजेश गावित यांना मिळताच त्यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पथक मदतीसाठी घटनास्थळावर पाठविले.व अपघातातील तब्बल ५० जखमींना खाजगी वाहनाने अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात पाठविले.त्यापैकी 44 जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.