राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कोठार आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यानी समजून घेतले चमत्कारांमागील विज्ञान
तळोदा : तालुक्यातील कोठार येथील श्री साईनाथ शिक्षण संस्था संचलित अनंत ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत 'राष्ट्रीय विज्ञान दिन'च्या निमित्ताने "शैक्षणिक गुणवत्ता कक्ष" अंतर्गत विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा यासाठी अंधश्रद्धेच्या, घटना, प्रयोग आणि त्यामागील विज्ञान या विषयांतर्गत विद्यार्थ्यांना विविध वैज्ञानिक चमत्कारांचे सादरीकरण करून दाखविण्यात आले. विद्यार्थ्यानी चमत्कार व अंधश्रद्धेमागील विज्ञान समजून घेत वैज्ञानिक दृष्टिकोनाचे धडे घेतले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पदवीधर प्राथमिक हरी भारती भारती होते याप्रसंगी प्राथमिक मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील माध्यमिक मुख्याध्यापक सी एम पाटील, शंकर मुठाळ,मनोज चिंचोले,निता गुरव,जयेश कोळी,अजय पवार,भूषण येवले,महेश वायकर,दीपक मालपुरे,धनजय मराठे, योगेश भारती,निंबा रावळे,जयवंत मराठे,जितेंद्र चौधरी,योगेश चव्हाण,शालिग्राम वाणी पन्नालाल पावरा,आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमांत शाळेचे शिक्षक हंसराज महाले यांनी विद्यार्थ्यांना पाण्याच्या दिवा पेटवणे, जीवेतून तार आरपार काढणे, रिकाम्या तांब्यातून तीर्थ काढणे,दिव्यशक्तीच्या साह्याने वस्तू ओळखणे व चिठ्ठीतील नावे ओळखणे, मंत्राच्या सहाय्याने अग्नी प्रज्वलित करणे, यांसारखे वैज्ञानिक चमत्कार सादर करून दाखवले.कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी त्यांनी चमत्करांमागील विज्ञान व हतचालाखी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.या चमत्कार सादरीकरण व अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमांत विदयार्थी देखिल उत्साहाने सहभागी झाले.
या प्रसंगी विद्यार्थ्याना प्रथमोपचार व आपत्ती व्यवस्थापनबाबत देखील शाळेतील शिक्षकांनी माहिती दिली. अध्यक्षीय मनोगतात हरी भारती यांनी विद्यार्थ्यांना जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याचे व त्याच्या प्रचार, प्रसाराचे आवाहन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भोजेसिंग राजपूत, नितीन कोळी,सुरेश पाडवी आदींनी परिश्रम घेतले.