सत्कारमूर्ती भाऊसाहेब शेटे सरांचा आदिवासी शिक्षक संघटना जव्हार यांच्या मार्फत सत्कार.
जव्हार प्रतिनिधी :-सुनिल जाबर
आज बघितले तर सगळ्या महाराष्ट्र भर कार्यरत असलेली गोरगरिबांसाठी व आदिवासी साठी प्रसिध्द असलेली महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटना जव्हार शाखेच्या वतीने महाराष्ट्र राज्य शासनाचा सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक सन्मान पुरस्काराने सन्मानित केलेले आदर्श शिक्षक सत्कारमूर्ती मा.श्री.भाऊसाहेब शेटे सरांचा आज त्यांच्या निवासस्थानी जावून यथोचित सत्कार करण्यात आला व मा .भाऊसाहेब शेटे सरांना त्याच्या पुढील वाटचालीस व शैक्षणिक व सामाजिक कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटना जव्हार शाखा तालुकाध्यक्ष श्री साईनाथ डोके सर ,कार्याध्यक्ष श्री विनायक दळवी सर उपाध्यक्ष श्री मनोज भोये सर ,उपाध्यक्ष श्री रामु दिवा सर सरचिटणीस श्री प्रकाश लहारे सर , व जिल्हा संघटक श्री उमेश जाबर सर तसेच जिल्हा प्रसिध्दीप्रमुख श्री प्रदीप चौधरी सर उपस्थित होते.