Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद केंद्र शाळा पवार पाडा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप



जिल्हा परिषद केंद्र शाळा पवार पाडा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप


जव्हार प्रतिनिधी : सुनिल जाबर


 जव्हार तालुक्यातील बहुचर्चित असलेली ग्रुप ग्रामपंचायत कौलाळे जिल्हा परिषद केंद्र शाळा पवार पाडा येथे ग्रामशिक्षण समिती अध्यक्ष सोमनाथ टोकरे ग्रुप ग्रामपंचायत कौलाळे यांच्या प्रयत्नाने महादेणगीदार प्रकाश चुंबळे यांच्याकडून जिल्हा परिषद केंद्र शाळा पवार पाडा येथे दहावीचे विद्यार्थी विद्यार्थिनी आज दिनांक प्रकाश चुंबळे त्यांच्याकडून शैक्षणिक वाटप करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. दहावीचे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या तसेच येणाऱ्या शैक्षणिक विषयक विविध विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रम दरम्यान बोलताना सांगत होते की शैक्षणिक जीवनामध्ये आपल्याला चांगले शिक्षण घ्यायचे असेल तर वेळेला,आरोग्य,शिक्षण घेणे अत्यंत गरजेचे आहे.वाचण्याची सवय, वेळेचे बंधन, मोठे माणसांचे व्याख्यान,श्रवण,वाचन,लिखाण, हे मोठ्या प्रमाणात केले पाहिजे. तसेच विविध शैक्षणिक क्षेत्रा क्षेत्राविषयी मुले मुली यांना पुढे ऍडमिशन घेण्यासाठी मार्गदर्शन हॉटेलचे सुविधा शासकीय योजना वेगवेगळे कोर्स बद्दल सखोल माहिती दिली. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले. तसेच ग्राम शिक्षण समिती अध्यक्ष ग्रुप ग्रामपंचायत कौलाळे सोमनाथ टोकरे पालक शिक्षक व विद्यार्थी यांनी शाळेसाठी एकत्र येऊन काम केले तर नक्की शाळेचा दर्जा सुधारला जाईल. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. पालक व शिक्षक यांचे नाते निर्माण झाले पाहिजे. माझं गाव माझी शाळा या भावनेने काम केले तर नक्कीच आदर्श शाळा घडायला वेळ लागणार नाही.गुरु विना खूप काही अपुरे आहे. असे म्हणायला वाव ठरणार नाही. कारण आपण अनेक गोष्टी पासून काही ना काही शिकत असतो. कधी काही वस्तू पासून कधी काही व्यक्ती पासून आणि मुख म्हणजे आपण शाळेत जाऊन आणि मुलाचे शिक्षण घेत असतो. ते म्हणजे ज्ञान आणि ज्ञान घेत असताना आपल्याला मुख म्हणजे शिक्षकाकडून मोलाचे मार्गदर्शन देऊन आणि शिक्षण ज्ञान लाभते. ते म्हणजे शिक्षण कडून हे शिक्षण देऊन आणि आपल्याला काही शिक्षकांचे गुरुजनांचे आदर केला पाहिजे . तसेच विद्यार्थ्यांनी मनामध्ये भीती न बाळगता पेपर कशाप्रकारे आपण सोडवता येणार व जास्तीत जास्त आपल्याला मार्क मिळू सकतील आपल्या शाळेचे कसे नाव उज्वल होईल. तसेच आई-वडिलांचे हे स्वप्न बाळगून आपण परीक्षेला समोरून गेले पाहिजे. मनामध्ये कोणतीही भीतीन बाळगता बिंदासपणे पेपर सोडवला पाहिजे.असे यावेळी सोमनाथ टोकरे यांनी मार्गदर्शन आणि विशेष बक्षीस घोषित केले.प्रथम साठी एक हजार रुपये आणि द्वितीय क्रमांक साठी पाचशे रुपये बक्षीस घोषित केले यांनी बोलताना सांगितले. तसेच केंद्रप्रमुख युवराज वाघ सर प्रकाश चुंबळे यांचे व सोमनाथ टोकरे यांचे आमच्या शाळेतील विद्यार्थींना वेळात वेळ काढून आले आणि शाळेतील विद्यार्थिनी शैक्षणिक साहित्य वाटप केल्याबद्दल त्यांनी मनापासून आभार मानले. तसेच कार्यक्रम दरम्यान उपस्थित औद्योगिक प्रशिक्षण संस्था जव्हार निवृत्त प्राचार्य प्रकाश चुंबळे, सोमनाथ टोकरे, भरत जोगारी, लक्ष्मण गडगे, हेमंत जाधव, केंद्रप्रमुख वाघ सर, सोनाली राही मॅडम. विशाखा सावकारे मॅडम, रतन हांडवा सर, गोपीनाथ राथड, इत्यादी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad