पोलिसांनी धामणी येथील चोरी प्रकरणी एकास केले अटक
आंबेगाव तालुक्यातील धामणी ज्येष्ठ दांपत्याला चाकूचा धाक दाखवून व जीवे मारण्याची धमकी देऊन रात्रीच्या वेळी जबरी चोरी करणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पोलिसांनी संगमनेर तालुक्यातुन अटक केली होती. त्यानंतर या गुन्ह्यातील चौथा आरोपी याच पारगाव पोलीस यांनी राहत्या पत्त्यावरुन अटक केली आहे.
पारगाव पोलीस ठाण्याचे हद्दीत धामणी येथे दिनांक 16/2/2023 रोजी ज्येष्ठ दांपत्याला हातपाय बांधून, चाकूचा धाक दाखवत 1, 60, 000 /- रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी गोविंद भगवंत जाधव यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असता चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शीळीमकर व त्यांच्या टीमने, वैभव दिगंबर नागरे (वय 19) नंदकुमार शंकर पवार (वय 21 रा. दरेवाडी ता. संगमनेर जि. अ नगर ) आकाश पांडुरंग फड (वय 26) यांना अटक करण्यात आली होती यातील चौथा आरोपी रवींद्र भाऊसाहेब फड (वय 31) रा. दरेवाडी ता. संगमनेर जि. अहमदनगर हा फरार होता. याबाबत पारगाव पोलीस तपास करत असताना गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे रवींद्र भाऊसाहेब फड याला राहत्या पत्यावर जावून अटक करण्यात आली आहे.
प्रतिनधी - आकाश भालेराव आंबेगाव