बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासरू ठार,नागरिकांनमध्ये भीती चे वातावरण
अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील रमेश अनंता चव्हाण यांच्या पाच वर्षाचे वासरू बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ठार झाले. अवसरी येथील चव्हाणमळा परिसरात राहणाऱ्या रमेश आनंदा चव्हाण या शेतकऱ्याच्या शेतात चरण्यासाठी त्यांनी वासरू बांधले होते. काही काळानंतर वासरू त्यांना तिथे आढळून आले नाही. त्यांना वाटले वासरू आजूबाजूला चरायला गेले असेल. त्यानंतर नवनाथ चव्हाण यांच्या शेतामध्ये वासराचा मृतदेह आढळला. तेथे जवळच असणाऱ्या कांद्याच्या शेतातून बिबट्याने वासरू फरपटत ओढत नेऊन नवनाथ चव्हाण यांच्या शेतात वासराचा फडशा पाडलेला आढळून आला आहे.
प्रतिनिधी - आकाश भालेराव आंबेगाव