वकील महिलेवर मांत्रिकाने गुंगीचे औषध टाकून बलात्कार केल्याचा आरोप?
पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील अडचणी, अंगात शिरलेले भूत काढण्याच्या नावाखाली वकील महिलेवर मांत्रिकाने पतीसमोरच बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पिडितेने पती व मांत्रिकाविरोधात बोरिवली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. आरोपींविरोधात ऍट्रॉसिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंगात शिरलेले 21 वर्षीय मुलीचे भूत उतरवण्यासाठी प्रसादात गुंगीचे औषध टाकून बलात्कार केल्याचा आरोप पिडितेने तक्रारीत केला आहे.