ब्रिटानिया कंपनीच्या वतीने 250 विद्यार्थ्यांना दररोज होणार लोहयुक्त बिस्किटांचे वाटप
ब्रिटानिया कंपनीच्या सामाजिक दायित्व निधी सीएसआर फंडातून चास परिसरातील अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना लोहयुक्त बिस्किटे वाटप करण्यात आली यामुळे मुलांच्या रक्तातील लोहाची कमतरता भरून निघणार असल्याची माहिती ब्रिटानिया कंपनीच्या वतीने अक्षय ढवळे व कंपनीचे प्रतिनिधी मिलिंद बारवे यांनी दिली.
चास ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चास गणेशवाडी कडेवाडी व जांभळे मळा शाळेतील व अंगणवाडीतील एकूण 250 विद्यार्थ्यांना दररोज लोहयुक्त बिस्किटांचे वाटप करण्यात येणार आहे.
बिस्किट वाटपाचा शुभारंभ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चास येथे ब्रिटानिया कंपनीचे प्रतिनिधी अक्षय ढवळे व मिलिंद बारवे यांच्या शुभहस्ते व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री बाजीराव बारवे, महादेव भोर,विक्रम बारवे, वैभव भोर , मुख्याध्यापक भास्कर चासकर, उपशिक्षक सुनील भेके यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
ब्रिटानिया कंपनीच्या वतीने विद्यार्थ्यांना लोहयुक्त बिस्किटे उपलब्ध करून दिल्याबद्दल कंपनीचे प्रतिनिधी मिलिंद बारवे यांचे शाळेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
प्रतिनिधी - आकाश भालेराव
चास