तळोदा बस स्थानकावर पिण्याच्या पाण्याची सुविधा करावी आगार प्रमुखांना निवेदन
तळोदा बसस्थानकात प्रवाशांची तहान भागविण्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी तळोदा शहर सामाजिक कार्यकर्त्यांच्यावतीने करण्यात आली आहे.
याबाबत तळोदा आगार व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, तळोदा बसस्थानकाशी सुमारे १२३ खेडी जोडली आहेत. या बसस्थानकावर नेहमी प्रवाशांची वर्दळ असते. अंकलेश्वर - बऱ्हाणपूर महामार्गावरील
मध्यवर्ती भागातील हे बसस्थानक आहे. या बसस्थानकात प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नाही. उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले असून तहानेने व्याकूळ व्हावे लागते. म्हणून तळोदा बस स्थानकात प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी तळोदा शहरातील सामाजिक कार्यकर्ते सचिन भोई, प्रमोद भोई, गिरीश भोई, राकेश भोई, राहूल शिवदे, जयेश कुंभार, निरज रामोळे, मयूर भोई, गोलू जावरे, दिनेश ठाकरे, मयूर वानखेडे, भूषण पावरा, प्रशांत मोरे आदींनी निवेदनातून केली आहे.