लोहा छत्रपती शिवाजी महाराज यांचा बंदिस्त पुतळा मुक्त करून जुन्या लोहा शहरात बसवा ; सतीश चव्हाण
[ संभाजी ब्रिगेड चा आक्रमक पवित्रा ]
(लोहा शिवाजी मुंडे) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा नाट्यमय घडामोडीनंतर नगरपालिकेच्या वतीने लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य स्मारक होऊन वाद मिटला असताना लोक वर्गणीतून आणलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा लोहा प्रशासनाने शासन दरबारी बंदिस्त करून ठेवला आहे.आता बंदिस्त महाराजा च्या पुतळ्या वरून वाद पेटण्याची संकेत दिसत आहेत संभाजी ब्रिगेड चे जिल्हा कार्य अध्यक्ष सतीश पाटील चव्हाण यांनी संभाजी ब्रिगेडच्या वतीने लवकरच आंदोलन छेडणार असल्याचे वार्ताहराची बोलताना सांगितले जुन्या लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा खूप दिवसापासून मोडकळीस आला असून त्या जागी लोक वर्गणीतून आणलेला व सध्या नगर परिषदेच्या जागी बंदिस्त असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जीर्णोद्धार करावा अशी मागणी करण्यात आली अन्यथा संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.