जव्हार मध्ये गो-हत्या..! जनावरे तस्करी करणाऱ्या पाच आरोपींना अटक..!!
जव्हार - दिनेश आंबेकर
जव्हार नंदनमाळ धाब्याजवळ होत होती गुरांची कत्तल…!! ग्रामस्थांच्या सतर्कतेने गो हत्या करतांना आरोपींना रंगेहाथ पकडले.
जव्हार पोलिसांचा तपास सुरू.!!
जव्हार बातमी : जव्हार शहरापासून अवघ्या ६ कि.मी.अंतरावर असलेल्या नंदनमाळ धाब्याजवळ मागील बाजूस बंद असलेल्या पोल्ट्रीफॉर्म जवळ जनावरांची तस्करी करून गायींची कत्तल केली जात असल्याची धक्कादायक घटना जव्हार तालुक्यात समोर आली आहे.
ही घटना शेतावर राहणा-या एका नागरिकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गावातील नागरिकांना बोलावूंन शोध घेवून हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे, त्यानंतर त्या गावक-यांनी वेळीच जव्हार पोलीस प्रशासनाला खबर देवून मंगळवारी मध्य रात्री जव्हार पोलिसांनी छापा टाकला असता गोहत्या करतांना पाच जणांना रंगेहात पकडले.सदर पाच आरोपींना ताब्यात घेतले असुन ते जव्हारच्या पोलिस कोठडीत आहेत. दोषींवर गो हत्या कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोहत्या करणाऱ्या आरोपींना कायद्यात पाच वर्षे तुरुंगवास अथवा दहा हजार रुपये दंड अशी शिक्षेची तरतूद कायद्यात आहे.
जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. जव्हार तालुक्यातील परिसरातून जनावरे चोरीला जाण्याचे प्रकार, घटना गेल्या चार, ते पाच महिन्यांपासून सतत सर्रास घडत होत्या. या उन्हाळ्यात मोकाट जनावरे सतत गायब होत होती.
त्यानंतर चोरीला गेलेली जनावरे दुसऱ्या गावात इतरत्र ठिकाणी शोध घेऊनही मिळत नव्हती, अशी ह्या परिसरातील अनेकांची जनावरे चोरीला गेली आणि जनावरे पुन्हा आलीच नाही. त्यानंतर शोध घेऊनही जनावरे मिळत नव्हती. असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.जव्हार कुंडाचापाडा येथील फिर्यादी मोहन अशोक चिभडे २१ वर्ष यांनी हा प्रकार उजेडात आणून दिला आहे. गोहत्या करणाऱ्या आरोपींची धब्याजवळ धावपळ बघून मोहन चिभडे यांनी नंदनमाळ गावातील ग्रामस्थांना बोलावून हा गोहत्या प्रकार समोर आणला आहे.हकीगत अशी की, गेल्या दोन दिवसांपूर्वी कुंडाचापाडा गावातील मोहन चिभडे या व्यक्तीची गाय चोरीला गेली असता, गाईचा शोध घेत असतांना, फिर्यादी चिभडे यांनी ह्या आरोपींना बघून, हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे, अशी शंका फिर्यादीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या साथीदार आणि नंदनमाळ ग्रामस्थांना घेऊन धाब्यावर गेले असता तेथे जनावरांची कत्तल होत असल्याचे निदर्शनास आले आणि तेथे डांबून ठेवण्यात आलेल्या जनावरांची हत्या केली होती, त्यात फिर्यादी मोहन चिभडे या व्यक्तीची हरवलेली गाय देखील आढळली.
त्यामुळे या नागरिकांनी तातडीने जव्हार पोलीस ठाण्यात माहिती देऊन दोषींना अटक केली आहे. याशिवाय जव्हार, मोखाडा व विक्रमगड या भागातील अनेक शेतकऱ्यांची जनावरे गायब झाल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या, म्हणून चोरीला गेलेल्या जनावरांना याच पाच जणांनी पळविले असल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे.
गोवंश हत्या करणारे आरोपी (१) शहजाद गुलजार खतीब (२) गुलजार अनवर खतीब (३) फैज गुलजार खतीब (४) मुसद्दीक गुलजार खतीब हे चारही आरोपी हे २० ते २२ वर्षाचे असून, हे आरोपी ख्याजानगर डोंगरी मनोर, पालघर जिल्ह्यातील आहेत. यापैकी आरोपी (५) सादिक शक्कील खतीब ४५ वर्षे, रूम नं.२ हुमा अपारर्टमेंट शिवाजीनगर राबोडी ठाणे येथील आहे.
गोहत्या प्रकरणातील आरोपींनी गेल्या काही महिन्यांपासुन नंदनमाळ ढाबा भाताच्या गुंड्या जमा करण्याच्या नावाखाली भाड्याने घेतला होता. माञ त्या आड हे आरोपी समाजाच्या नजरेत धूळ फेकत जनावरांची तस्करी, गुरांची कत्तल करत असल्याचे ग्रामस्थांच्या सर्तकने चव्हाट्यावर आले आहे.सदर गोहत्या प्रकरणातील आरोपींना जव्हार पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. घडलेल्या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजीव पिंपळे यांनी तात्काळ भेट देऊन पोलीस निरीक्षक सुधीर संखे जव्हार पोलीस स्टेशन यांनी तात्काळ भेटी देऊन संबंधित आरोपींना अटक करून पुढील चौकशी सुरू केली आहे. तसेच यावेळी पो.हवालदार आर.सी जाधव, तपासणीस पोलीस निरीक्षक सुधीर संखे यांच्याकडे पुढील तपास सुरू आहे.
“महाराष्ट्र नवनिर्माण सेना जव्हार तालुका यांनी जव्हार पोलिसांना लेखी पत्र देवून ह्या गोहत्या करणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मनसेनी केली आहे. तसेच विशेष म्हणजे जव्हार तालुक्यातील ग्रामीण आदिवासी भागांमध्ये पारंपरिक व्यवसाय हा शेती आहे.
शेती करत असताना, जनावरांची नितांत आवश्यकता असते, परंतु अशा परिस्थितीत जनावरे चोरीला गेल्यास शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होऊन शेती करण्यास अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. संबंधित गोहत्या करणाऱ्या आरोपींना अधिक शिक्षा व्हावी अशी मागणी जव्हार तालुका मनसे यांनी पोलिसांना लेखी पञाद्वारे केली आहे.”
– गोपाळ वझरे,मनसे जव्हार तालुका अध्यक्ष,जव्हार.जि.पालघर.