रांझणी येथील श्रीकृष्ण गोशाळेत गोसेवा आयोग निर्णयाचे गोमाता पुजन करून स्वागत
तळोदा तालुक्यातील रांझणी येथील श्रीकृष्ण गोशाळेत गोसेवा आयोगाच्या निर्णयाचे गोमाता पूजन करून स्वागत करण्यात आले .यावेळी गोशाळेचे संचालक धनराज मराठे व ग्रा प सदस्या सौ नम्रता मराठे यांनी गोमातेचे पूजन केले .
दरम्यान महाराष्ट्र राज्याच्या अमृत काळातील प्रथम अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोग स्थापन करण्याच्या निर्णयाचे यावेळी स्वागत करण्यात येऊन देशी गोव्याच्या संवर्धनासाठी भ्रूण बाह्य फलन प्रत्यारोपण सुविधा वाढ करण्याच्या निर्णय देशी गोवंशांच्या संख्यात्मक आणि गुणवत्तेमध्ये वाढ करणारा ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
बऱ्याच वर्षापासून गोरक्षण आणि गो संवर्धनाकरिता गोसेवा आयोग स्थापन करण्यासंदर्भात मागणी करण्यात येत होती. यावर्षीच्या अर्थसंकल्पात समावेश झाल्याने गोपालक व संस्थांसाठी दिलासा मिळाला आहे .या गोसेवा आयोग मार्फत गोवर्धन सेवा केंद्र योजना ,गोमय मूल्यवर्धन योजना राबविण्यात येणार असून या माध्यमातून गोपालकांना गोवंश पाळताना येणाऱ्या आर्थिक अडचणीपासून दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.