Type Here to Get Search Results !

प्रा.डॉ.विष्णू गुंजाळ व रत्नप्रभा पोतदार लिखित "अव्यक्त " पुस्तकाचे प्रकाशन



प्रा.डॉ.विष्णू गुंजाळ व रत्नप्रभा पोतदार लिखित "अव्यक्त " पुस्तकाचे प्रकाशन 

           

जळगाव/प्रतिनिधि -विशाल मैराळे


भगिनी मंडळ चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथील प्रा.डॉ.विष्णू गुंजाळ व संशोधक विद्यार्थीनी सौ. रत्नप्रभा पोतदार लिखित 'अव्यक्त " या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रसंगी प्रथितयश उद्योगपती श्री.आशिषभाई अरुणलाल गुजराथी, प्रा.डॉ.आंबादास मोहिते (संस्थापक अध्यक्ष, मास्वे प्राध्यापक संघटना ) प्रा.डॉ.विलास चव्हाण, श्री.चंद्रहासभाई गुजराथी (अध्यक्ष, ओम शांती सह.पत.संस्था.,चोपडा) मा.सौ.पुनमताई गुजराथी (अध्यक्षा, भगिनी मंडळ शैक्षणिक संकुल, चोपडा ), सौ.अश्विनीताई गुजराथी (सहसचिव, भगिनी मंडळ शैक्षणिक संकुल चोपडा ) प्राचार्य डॉ.ईश्वर सौंदाणकर, उपप्राचार्य डॉ.आशिष गुजराथी, प्रा.डॉ.राहुल निकम, प्रा.डॉ.संबोधी देशपांडे, प्राचार्य डॉ.संजय चौधरी, प्राचार्य सुनील बारी, प्राचार्य उदय ब्रम्हे आदी मान्यवर हजर होते.




            प्रा.डॉ.विष्णू गुंजाळ व सौ.रत्नप्रभा पोतदार यांचे हे पुस्तक संशोधन कार्यावर आधारलेले आहे. "स्रियांकडून पुरुषांवर होणारा कौटुंबिक हिंसाचार " या विषयावरील संशोधनावर आधारित हे एक अभिनव पुस्तक आहे. हे पुस्तक समाजकार्याच्या विद्यार्थ्यांसोबतच ते इतर अभ्यासक, संशोधक, सामाजीक संस्था यांना देखील उपयुक्त ठरेल असा आशावाद यावेळी प्रा. डॉ. विष्णू गुंजाळ व सौ.रत्नप्रभा पोतदार यांनी व्यक्त केला. सौ.रत्नप्रभा पोतदार ह्या सर्व कुटुंबासमवेत पुण्यावरून पुस्तक प्रकाशनासाठी चोपडा येथे आलेल्या होत्या.

         यावेळी उपस्थित आशिषभाई गुजराथी, चंद्रहासभाई गुजराथी, सौ.पुनमताई गुजराथी, सौ.अश्विनीताई गुजराथी, विचारपीठावरील सर्व मान्यवर, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सहकारी प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारिवृंद व विद्यार्थी यांनी समाधान व्यक्त करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. आणि लवकरात लवकर आणखी काही साहित्य समाजकार्याच्या विद्यार्थ्यांना व सामाजिक घटकांना उपलब्ध करून घ्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad