श्रेयससिंग परदेशी यास राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत कांस्य पदक
तळोदा येथील आणि सध्या जळगाव येथे वास्तव्य असलेले श्रेयससिंग महेन्द्रसिंग परदेशी यांनी क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धा 2022-2023 बारामती पुणे येथे झालेल्या कराटे स्पर्धेत पोलीस स्पोर्ट्स अकॅडमी चा खेळाडू कु. श्रेयससिंग महेंद्रसिंग परदेशी जळगाव याने 19 वर्षाखालील वयोगटात कांस्यपदक तृतीय क्रमांक मिळविले कु.श्रेयस ह्याला राजेंद्र जंजाळे व अश्विनी निकम व कोमल पाटील यांच्या सहकार्य लाभले. यापूर्वी विभाग स्तर नाशिक येथे त्यांना सुवर्ण पदक मिळाले होते त्याच्या या यशाबद्दल जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी त्यांचे अभिनंदन केले
श्रेयससिंग हा जळगाव शहर पोलिस अमलदार सविता परदेशी आणि अभियंता महेन्द्रसिंग परदेशी यांचे चिरंजीव असून तळोदा शिवसेना शहर प्रमुख जगदीश परदेशी प्रा रामचंद्र परदेशी यांचे पूतने आहेत