सातपुड्यातील देशी सफरचंद म्हणजे जावा ॲप्पल विक्रीसाठी दाखल
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी बाजारपेठेत सातपुड्यात दुर्मिळ आढणारे देशी सफरचंद म्हणजे जावा ॲप्पल विक्रीसाठी दाखल झाले आहे. जावा ॲप्पल खरेदीसाठी नागरीकांची गर्दी होत आहे.
सातपुड्याच्या पर्वत रांगेत विविध ऋतुंमध्ये वेगवेगळी फळे येतात. सातपुड्यातील रानमेवा असलेले सिताफळ प्रसिद्ध असून त्याप्रमाणेच देशी सफरचंद म्हणजें जावा ॲप्पल हे सातपुड्यात दुर्मिळपणे आढळून येते. जावा ॲप्पल हे मोलगी येथील बाजारपेठेत विक्रीसाठी आल्याने खरेदीसाठी गर्दी होत आहे. सातपुड्यात जांभूळ, आवळे, ओलमे, धामने, सिताफळे अशी विविध फळे येत असल्याने बाजारपेठेत विक्रीसाठी आल्यावर मागणी होते. सातपुड्यातील स्ट्रॉबेरीलाही विशेष मागणी असते. आता मोलगीच्या बाजारपेठेत देशी सफरचंद असलेले जावा ॲप्पल विक्रीसाठी आले आहे.