Type Here to Get Search Results !

केळी मालाची रक्कम देण्यास टाळाटाळ करुन व्यापार्‍याची पावणे दहा लाखाची फसवणूक



केळी मालाची रक्कम देण्यास टाळाटाळ करुन व्यापार्‍याची पावणे दहा लाखाची फसवणूक



तळोदा - केळी मालाची रक्कम न देता एका व्यापार्‍याची 9 लाख 76 हजारात फसवणूक झाली आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील वाहिद फु्रट कंपनीचे प्रो.वाहिद अहसान ईलाही याच्याविरुध्द तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळोदा तालुक्यातील बोरद येथील भोलेशंकर जोगेंद्रसिंग यांचे तळोदा येथे जोगेंद्रसिंग फ्रुट अँड व्हेजीटेबल कंपनी आहे. उत्तर प्रदेशातील वाहिद फु्रट कंपनीचे प्रो.वाहिद अहसान ईलाही यांनी केळी मालाची मागणी केली. त्यानुसार भोलेशंकर जोगेंद्रसिंग यांनी केळीचा माल भरुन 29 लाख 20 हजार 843 रुपये किंमतीची केळी पाठविली वाहिद अहसान ईलाही यांनी 19 लाख 44 हजार रुपये दिले. परंतू उर्वरित केळीची 9 लाख 76 हजार 843 रुपये देण्यास वाहिद ईलाही याने उडवाउडवीची उत्तरे देत फसवणुक केली. याबाबत भालेशंकर जोगेंद्रसिंग यांनी तळोदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वाहिद फ्रुट कंपनीतर्फे प्रो.प्रा.वाहिद अहसान ईलाही याच्याविरुध्द भादंवि कलम 420, 406, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि.अमितकुमार बागुल करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad