विक्रमगड तालुक्यात ग्रामीण भागात अवकाळी पाउस.
जव्हार - दिनेश आंबेकर
पालघर जिल्ह्यात विक्रमगड तालुक्यात पहाटे पाच वाजेपासून बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. वाडा, विक्रमगड, जव्हार आणि पालघरच्या काही भागात विजांचा कडकडाटासह पाऊस बरसला.
यामुळे सर्वसामान्य शेतकरी, बागायतदारस वीट भट्टी व्यावसायिक यांच्यात पुन्हा चिंतेचे वातावरण पसरलं आहे. तीन-चार दिवसांपूर्वी काही भागात अवकाळी पावसाचा सुद्धा फटका बसला होता आंबा त्याचप्रमाणे इतर रब्बी पिकांचं मोठं नुकसान झाले.पुन्हा एकदा विक्रमगड शहरासह ग्रामीण भागात पहाटे पाच वाजेपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला.
या पावसामुळे कांदा, गहू, वाल, उडीद, हरभरा, आंबा, यांसह भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला. अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटामध्ये आला आहे.