सहकार शिरोमणी स्व. वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे सभासद पंढरपूर तहसील कार्यालयासमोर उपोषण
त्यांच्याकडुन कारण जाणुन घेतलं असता ते म्हणाले, गेले तीन चार वर्षांपूर्वी माझ्या नावावर कारखान्याने बँक ऑफ इंडिया कडुन कर्ज उचलले आहे, आणि आता बँक मला वसुलीचा तगादा लावत आहे, आणि कारखान्यांकडून कोणतेही कर्ज भरण्याबाबत हालचाली सुरू नाहीत, त्यामुळेच मला न्याय मिळावा म्हणून रणजीत बागल हे उपोषणास बसले आहेत, तालुकाप्रमुख संजय घोडके यांनी चेअरमन कल्याणराव काळे यांना फोन लावला, व त्यांचा प्रश्न चेअरमन पर्यंत पोहचवत असताना त्यांना प्रश्न त्वरीत सोडवावा अन्यथा आम्ही देखील आंदोलन करत या उपोषणकर्यांच्या पाठीशी भक्कम पणे उभारू असे सांगितले, असा इशारा देताच चेअरमन खडबडून जागे झाले आणि त्यांनी अवघ्या पंधरा मिनिटात कारखाना प्रशासनाचे दोन अधिकारी तात्काळ उपोषणस्थळी पाठवले, आम्ही प्रशासनाकडून एका आठवड्याच्या आत सर्व कर्ज कारखाना भरेल असे लेखी घेतले, आणि यशस्वी तोडगा काढण्यात आला.