Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांचे नव वर्ष गुडी पाडवा.साडेतीन मुहूर्तापैकी एक पवित्र स्थान गुढीपाडवा



शेतकऱ्यांचे नव वर्ष गुडी पाडवा.साडेतीन मुहूर्तापैकी एक पवित्र स्थान गुढीपाडवा 



ढाणकी प्रतिनिधी,दिगांबर शिरडकर.



गुडी पाडव्याला अनन्य साधारण महत्व असून साडेतीन मुहूर्तापैकी एक असे पवित्र मानाचे स्थान गुढीपाडव्याला समजले जातेया दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू श्री रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले; तो हा विजयोत्सवाचा दिवस. याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवासही संपला होता, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस गुडी पाडवा म्हणून साजरा केला जातो.तसेच हिंदू नववर्षाचा, व शेतकऱ्यांचा सर्वात मुख्य समजले जाणारे दोन सन एक पोळा व गुढीपाडवा या दिवशी प्रातकाळी उठून स्नान वैगेरे करून गुडी उभारली जाते. गुडीस लंब असा वेळू किंव्हा भाला,त्यास नवीन साडी, आंब्याचा ढाळा त्यास आंबा असावा,लिंबाचा ढाळा ,मैदा व साखरे पासून बनवलेली घाटी ,पितळेचा अथवा तांब्याचा तांब्या उलट्या स्वरूपात त्यास चुना,गेरूने सजऊन गुडी उभारली जाते. व पूजा आरती करून नैवेद्य अर्पण केला जातो. घरी आंब्याच्या पानाच्या तोरणांनी व झेंडूच्या माळांनी संपूर्ण घर सजवले जाते अंगणात व गुढी सभोवती रांगोळी काढली जाते. हे घरचे काम आटोपल्या नंतर सूर्योदय होण्याचा अगोदर शेतात तास करण्यासाठी निघले जाते.बैलाला मालक स्वच्छ धुऊन शिंगास वारणीस,लावले जाते आणि बैलाला झुल टाकून, कंपाळावर पान बांधले जातात, व डोक्यावर सुंदर असे गोंडे बांधून बैलास सजवले जाते. या दिवशी बैलांवर पाच तास हाकले जातात व बैलास नैवेद्य अर्पण करून शेजारील आजूबाजूचे शेतकरी बांधव याना बोलून जेवण केले जाते. या दिवशी शेतकरी आपल्या लाडक्या सर्ज्या , राज्या विषई कृतज्ञता बाळगतो .सर्व कामे सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान आटोपली जातात.या दिवशी शेतकरी व बैलाचा चेहऱ्यावर जो आनंद दिसतो तो इतरत्र कोणत्याही दिवशी असा आनंद दिसत नाही. याच दिवशी नव्हीन शेती कामासाठी लागणारा गडी मुख्याने कामावर रुजू होतो.पाडवा ते पाडवा असे शेती कामासाठी त्याचे एका वर्षाचे साल असते.असे असते नवीन वर्ष नव्हीं पहाट, नव चैतन्य, नव्हा उत्साह,आनंद प्रातकाळा पासून ते सूर्योदय पर्यंत . शेतकऱ्यांचे व हिंदू समाजाचे जरी हे नव्हं वर्ष असले तरी, आजच्या आधुनिक तेच्या काळात तरुण पिढी पूर्णतः थर्टी फर्स्ट डे च्या रात्री मध्य धुंद अवस्थेत नशा वैगेरे करून चिकन बिर्याणी खाऊन डी जे च्या तालावर थिरकणारी तरुण पिढी दिसून येते.आणि रात्री पार्टी व आयाशी करून एक जानेवारी ला दिवसभर झोपून राहते. त्यामुळे नवीन वर्षाची पहाट कशी साजरी होणार.एक दिवस केलेले नव वर्षाचे स्वागत अवघ आयुष्य बरबाद करून टाकते. एका दिवशीच्या पार्टीमुळे व आयाशिमुळे अवघ आयुष्य जर्जर होते नको त्या वाईट सवई व अवघ आयुष्य व्यसनाधीन होते. म्हणून आपला आपण विचार करून नव वर्ष हे गुडी पाडव्यालाच साजरे करावे.जेणे करून सुख शांती, धनसंपदा ,चांगले आरोग्य लाभेल व सर्वत्र आनंद दरवळू लागेल. म्हणून गुडी पाडव्याच्या मंगल दिनी व हिंदू नव वर्षाच्या आपणास भरभरून शुभेच्छा.




दिगांबर माधव शिरडकर मु.पो. ढाणकी ता.उमरखेड जिल्हा यवतमाळ. मो.न.9657066005

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad