विधानपरिषद आमदर श्री.आमश्यापाडवी यांची अनुसूचित जमाती कल्याण समिती व रोजगार हमी योजना समितीवर निवड
अक्कलकुवा : सन २०२३ / २४ या वर्षा साठी महाराष्ट्र विधान मंडळाच्या विविध समित्यांवर सदस्यांची नियुक्ती विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी केली आहे.
त्यात विधान परिषदेचे सदस्य आमश्या पाडवी यांची विधिमंडळाच्या अतिमहत्वाच्या आहे. अश्या समितींवर नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधान मंडळाच्या विविध समित्यांवर सन २०२३ / २४ या वर्षासाठी सदस्य नियुक्त करण्यासाठी सदस्यांची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या दादा पाडवी यांची अनुसूचित जमाती कल्याण समिती व रोजगार हमी योजना
समिती या महत्वाच्या समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली
या निवडीसाठी शिफारस केल्या बद्दल आमदार पाडवी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व गट नेते आ. अनिल परब यांचे आभार मानले आहे. विधान मंडळाच्या महत्वाच्या समितींवर आदिवासी समाजातील बुलंद तोफ असलेल्या आमश्यादादा पाडवी यांची नियुक्ती झाल्याने संपुर्ण नंदुरबार जिल्ह्यात आनंद व्यक्त होत आहे.