जुनी पेन्शन योजना शासनाने लागू करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, शाखा जव्हार यांच्यामार्फत राज्यव्यापी बेमुदत संपाचे आवाहन.
जव्हार - दिनेश आंबेकर
एकच मिशन,जुनी पेन्शन
पेन्शन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची; कर्मचाऱ्यांची एकच मागणी जुनी पेन्शन लागू करा.
जव्हार - जुनी पेन्शन योजना शासनाने लागू करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, शाखा जव्हार यांच्यामार्फत राज्यव्यापी बेमुदत संपाचे आवाहन करण्यात आले होते.
त्या निमित्त जव्हार शहरात हि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून मंगळवारी प्रांत कार्यालय ते अप्पर जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला.
ह्या मोर्चात शंभरहून अधिक राज्य कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. मोर्चातील महत्त्वाची मागणी १९८२ ची जुनी पेन्शन योजना शासनाने लागु करावी. आमदारांना फक्त पाच वर्षासाठी निवडून आल्यावर आयुष्यभर पेन्शन योजना लागू होते तर सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांना का नको ? अशा प्रश्नही मोर्चातील कर्मचाऱ्यांनी प्रसार माध्यमांसमोर मांडला. मोर्चात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, महसुल विभाग, ग्रामसेवक युनियन, आरोग्य विभाग, तलाठी संघ, वनरक्षक वनपाल संघटना, आश्रमशाळा सिटू संघटना, प्राथमिक शिक्षक संघ, आदिवासी शिक्षक संघटना, शिक्षकसेना संघटना, शिक्षक भारती संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना, कृषी विभाग, आय.टी.आय.संघटना, महाविद्यालयीन शिक्षक संघ व इतर विविध संघटना मोर्चात सहभागी होऊन राज्य कर्मचाऱ्यांकडून जव्हार अप्पर जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने राज्य कर्मचारी मोर्चात सहभागी झाले होते.