Type Here to Get Search Results !

मटका,जुगार खुले आम सुरू (राजकीय वरद हस्त का ?भत्ते घेऊन चालू आहे अवैध धंदे ?जनतेपुढे असा ठाकतो आहे प्रश्न)



मटका,जुगार खुले आम सुरू (राजकीय वरद हस्त का ?भत्ते घेऊन चालू आहे अवैध धंदे ?जनतेपुढे असा ठाकतो आहे प्रश्न)

 

ढाणकी प्रतिनिधी,दिगांबर शिरडकर. 

                     ढाणकी येथे अवैध धंद्याला ऊत्त आला असून खुलेआम मटका सुरू करण्यात आलेला आहे.पोलिस प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेऊन डोळे लाऊन गोळे गिळत आहे.वेळीच अवैध धंद्यावर अंकुश न ठेवल्यास गंभीर स्वरूपाचे गुन्हे गारीचे प्रमाण वाढेल व परिस्थिती अवाक्या बाहेर जाईल असे चित्र दिसून येत आहे.त्यामुळे त्यावर आवर घालने मुश्किल होईल. अवेद्य धंद्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण होऊन चोऱ्या,डकायती,भांडगडी तसेच गंभीर स्वरूपाचे गुने हाती घेतले जातील असे संकेत दिसून येत आहे. गावात सुख शांती, समाधान चालू आहे ते दिसून येणारं नाही.गावात आता पर्यंत मटका ,जुगार अवैध धंदे बंद होते ते अचानक पने चालू होण्या मागचे कारण,मंजे नेमके काय? पोलिस प्रशासन व अवैध धंदे चालवणारे यांच्यात काही देवाण घेवाण तर नाही ना? अवैध धंदे करणाऱ्यावर पोलिसांचा वचक राहिला नाही का? किंवा या सर्व बाबी मागे राजकीय वरद हस्त तर नाही ना? असे नसल्यास अवैध धंदे चालवणार्यांवर गुन्हा दाखल का केला जात नाही? असे अनेक सवाल जवाब गावात नागरिकांतून बोलले जात आहे. व चर्चेला उधाण आले आहे.असे जर नसल्यास यावर त्वरित कारवाई केल्यास अवैध धंदे बंद होतील. व गंभीर स्वरूपाचे गुणे सुद्धा बंद होतील . आजची तरुण पिढी जी कामाला लागली आहे ती,गावात फिरण्याचे प्रमाण वाढेल व गावात याच टुकार मुलांमुळे गावात भानगडीचे प्रमाण सुद्धा वाढेल. जे दहावी, बारावी चे विद्यार्थी आहेत ते सुध्दा यात भूर्कटले जातील. जे देशाचे भविष्य आहे.घरची,देशाची, समाजाची धुरा येणाऱ्या काळात यांच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांचे जीवन सुध्दा उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. अशे चिन्ह गावातील अवैद्य धंद्यामुळे होतील असे चित्र दिसून येत आहे.मेहनत करून आपल्या आई वडील याना च्यार पैसे कमवून देणारी तरुण पिढी पूर्णतः व्यसनाधिन होऊन वायाला जाईल. वेळीच अवैध धंद्यावर अंकुश न ठेवल्यास अवैद्य धंध्याचे माहेरघर म्हणून ढाणकी प्रसिध्दीस पावेल आणि याचा परिणाम पोलीस विभागाच्या विश्वासाहात वर पडेल. परिणामी सामान्य नागरीकांचा पोलिस प्रशासनावरील विश्वास उडुन जाईल.परिस्थिती अवाक्याच्या बाहेर जाऊ नये या साठी पोलिस प्रशासनानी वेळीच गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित कारवाई करावी.गावातील परिस्थिती अवाक्या बाहेर गेल्यास त्यास जबाबदार दुसरे कोणी नसुन पोलिस प्रशासन जबाबदार राहणार हे स्पष्ट दिसून येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad