राज्य सरकारी कर्मचारी संपाबाबत ठाम; जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी
धडगाव ता. राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारीभ आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना तातडीने लागू करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा कर्मचाऱ्यांनी निर्धार कायम राखलाआहे.आज धडगाव शिक्षक कर्मचाऱ्यांकडून गटशिक्षणाधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
शासकीय सेवेत नोव्हेंबर २००५पासून रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना रद्द करून नवीन पेन्शन योजना लागू केली आहे. नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आग्रही आहेत. शासनाने आजपर्यंत कोणतेही सकारात्मक पाऊल उचलेले नाही. महाराष्ट्र नागरीसेवा निवृत्तीवेतन१९८२ व
१९८४ पुन्हा पूर्ववत लागू
करावी या मागण्या व इतर मागण्यासाठी आज १४ता. पासून बेमुदत संप पुकारला आहे.
प्रमुख मागण्या
नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करावी, कंत्राटी व योजना कामगार प्रदीर्घकाळ सेवेत असल्यामुळे सर्वांना समान किमान वेतन देऊन त्यांच्या सेवा नियमित कराव्यात, सर्व रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावीत, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या विनाशर्त करण्यात याव्यात. तसेच करोनाकाळात मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना विहित वयमर्यादेत सवलत देण्यात यावी, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व आनुषंगिक भत्ते मंजूर करावे, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यात यावे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.सदर निवेदन वर धिरसिंग वसावे, रुपेश नागलगावे, प्रवीण दरेकर,सुवर्णा मावची,मीना गावित,वनिता वळवी,विजय पराडके आदी
कर्मचारी निवेदन देतांना उपस्थित
होते