अवकाळी पिकांचे नुकसान जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची भेट व पहाणी
तळोदा तालुक्यात दि 13 रोजी रात्री झालेल्या पावसामुळे व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागात पिकांची पाहणी करताना नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मंदारजी पत्की, तळोदा तहसीलदार गिरीश वखारे कृषी विभागाचे कृषी अधिकारी नरेंद्र महाले, नायब तहसीलदार शैलेंद्र गवते तसेच राजेश पाडवी आमदार शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघ यांच्या सूचनेनुसार प्रत्यक्ष स्थळ भेट करावी म्हणून भारतीय जनता पार्टीचे विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे, विठ्ठल बागले, प्रवीण वळवी, दारासिंग वसावे, किरण सूर्यवंशी, मोड ग्रामपंचायतचे सरपंच पुंडलिक राजपूत यांनी नुकसान झालेल्या श्रीमती उज्वला विलास पाटील मोड शिवार व रमण बोलसिंग वळवी खरवड शिवार तसेच मोहन सक्कन ठाकरे धानोरा शिवार याचां शेताची पाहणी शेताच्या बांधावर जाऊन केली.