तळोदा शहरात अवकाळी सह गारपीट लग्न आयोजक व वऱ्हाडिंची तारांबळा
तळोदा शहरात रात्रीच्या वेळेस गारपीट झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली सध्या लग्नसराई सुरू असून अनेकांचे लग्न मंडप टाकण्यात आले होते यामुळे अचानक आलेला अवकाळी व गारपीट आणि लग्न समारंभात वऱ्हाडी व आयोजकांची चांगली तारांबळ उडाली लग्न मंडपात गारपीट झाल्याने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाला होता यानंतर काल पुन्हा अवकाळीने दस्तक दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे अवकाळी मुळे गहू काढणी आलेला गहू हरभरा डांगर टरबूज व रब्बी पिकांना फटका बसला आहे सध्या चार दिवस पावसाचे वातावरण असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने पीक उघड्यावर ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे यापूर्वी काल हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला होता.
तळोदा शहरात लग्न मंडपात जेवण करताना व वऱ्हाडी धांदल वऱ्हाडी मंडळीला डोक्यावर खर्ची घेऊन मार्गस्थ होण्याची वेळ आली होती