Type Here to Get Search Results !

लोकप्रतिनिधी म्हणजेच लोकसेवक कार्य असते हे विधानपरिषद आमदार मा.आमश्यादादा पाडवी यांनी दाखवून दिले लोकसेवा हीच खरी सेवा



आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सेविका या आंदोलन निमित्य आज दि. 13/03/2023 रोजी आजाद मैदान मुंबई येथे आल्या होत्या. सायंकाळ झाली आणि मैदान रिकामा करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाने त्यांना दिल्या.




दिवसभर थकून भागून भुकेल्या स्थितीत रात्र कुठे काढायची हा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला.

याप्रसंगी त्यांना जिल्ह्यातील एकच लोकप्रतिनिधी यांची आठवण झाली ती म्हणजे आपले आमश्या दादा.




त्या भगिनींनी दादांना फोन केला असता त्यांना एकच वाक्य कानी पडलं ते असं कि 'पोरींनो लगेच आमदार निवासात यायचं, आधी पोटभर जेवायचं आणि मग माझ्या कक्षात आराम करायचा. माझी व्यवस्था मी बाहेर करून घेतो'.

हीच ती सामान्यता, हीच ती जमिनीशी जोडून राहायची वृत्ती.


आज खऱ्या अर्थाने एक लोक प्रतिनिधी म्हणजेच लोकसेवक काय असतो हे आपले लाडके आमदार आमश्या दादांनी दाखवून दिले.


कार्य फोटो साठी नव्हे तर जिल्ह्यातील व राज्यातील समस्त आदिवासी जनतेचा प्रतिनिधी म्हणून करायचे. त्यात कुठेही कमी राहता कामा नये.


हिंदुहृदयसम्राट सरनेपाती शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे ती म्हणजे '80% समाजकारण आणि 20% राजकारण' याच उक्ती प्रमाणे आजवर कार्य केले आणि यापुढेही सातत्याने करत असणार हेच जणू दादांनी आज दाखवून दिले.


सदैव सगळ्यांच्या मदतीसाठी तत्पर असलेले दादा आज त्यांच्या या कार्याने आमच्या मनात अधिकाधिक रुजले आहेत..


- आमश्या दादा यांचा एक कार्यकर्ता..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad