आज रोजी आम्ही श्री संत तुकाराम महाराज बीज च्या निमित्ताने बंदोबस्त बजावत असताना एक वारकरी माऊली जवळ आले आणि केविलवाणा चेहरा करून हलकेसे डोळ्यात पाणी आलेले, बोलली की साहेब माझी नदी काठावर अंघोळ करत असताना पिशवी चोरी ला गेली त्यात 1000 रुपये होते आणि माझे कपडे होते. त्यांतर आम्ही माऊली ला आधार देत सोबत बसवले पाणी व नाष्टा देत त्यांचे सांत्वन केले. व आमचे सिनिअर साहेब PSI मेदवाड (तळेगाव पोलीस स्टेशन) यांनी स्वतः जाऊन त्या माऊली साठी नवीन सदरा व धोतर घेऊन आले व तो परिधान केल्यानंतर त्या माऊली ने गहिवरून आमचे पाय धरून खूप उपकार झाले साहेब असं बोलून त्याला त्यांचे आनंदाश्रू लपवता आले नाही त्यानंतर, गाडी प्रवासासाठी 200 रुपये दिले जाताना मात्र माऊली तुम्हला देव काही कमी पडू देणार नाही असा आशीर्वाद देऊन गेला. आम्हा सर्वांच्या चेहरयावर देखील एकप्रकारचे समाधान होते की आज आम्हला माऊली ची सेवा करण्याची संधी मिळाली ही आमच्या साठी मोठी गोष्ट आहे...
‼️श्री संत तुकाराम महाराज की जय..
PSI संग्राम मालकर (वाकड पोलीस स्टेशन)