ग्रामपंचायत कासटवाडी नागरिकांमध्ये विकासकामांमुळे आनंदाचे वातावरण !
जव्हार - दिनेश आंबेकर
जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत कासटवाडी मध्ये लोकनियुक्त सरपंच कल्पेश विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून नरेगा मार्फत गरदवाडी, जाधवपाडा, जयेस्वर येथे गल्लीबोळ पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामांचे उद्घाटन करण्यात आले, या प्रसंगी विनायक राऊत (शिवसेना तालुका प्रमुख), लोकनियुक्त सरपंच, कल्पेश विनायक राऊत, ग्रामविकास अधिकारी, किशोर सोनवणे ग्रामपंचायत सदस्य- बाळू भोये, त्रिंबक रावते, नितीन चौधरी, ग्रामस्थ सिताराम माळगावी , प्रकाश कवदरे, देवराम धिंडा, भालचंद्र शिंदे, उमेश खिरारी, राहुल शेंडे, यांच्या उपस्थित पार पडला या कामामुळे ग्रामपंचायत कासटवाडी हदितील सर्व गावातील प्रत्येक खेड्या पाड्यातील गळीबोळ होणार असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले, गेली अनेक वर्ष रखडलेली कामे ३-४ महिन्यातच पूर्ण होत आहेत, ग्रा.सरपंच आपल्या अडचणी आपल्या गावात प्रत्यक्ष भेट देवून अडचणी सोडवत आहेत, प्रत्येक गावात विकासकामांच्या बरोबर ग्रामस्थांना रोजगार मिळत आहे त्यामुळे लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.