राज्यात हरभरा खरेदी केंद्र सुरु करावे मागणीसाठी आ. आमश्या पाडवी यांनी विधान भवनाच्या पायरीवर आंदोलन
तळोदा:-
शासनाने राज्यात हरभरा खरेदी केंद्र सुरु करावे या मागणीसाठी आ. आमश्या पाडवी यांनी विधान भवनाच्या पायरीवर आंदोलन केले.
राज्यातील शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमी भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. महागाईसह अवकाळीने शेतकऱ्यांच्या हाती आलेले पिक हिरावून नेले आहे. हरभरा पिकाची शासकिय खरेदी होत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. म्हणून शासनाने त्वरीत हरभरा खरेदी केंद्र सुरु करावे या मागणीसाठी आ. आमश्या पाडवी यांनी विधानभवनाच्या पायरीवर बसून आंदोलन केले. याप्रसंगी आ. राहूल पाटील, आ. कैलास पाटील, आ. किशोर दराडे आदी उपस्थित होते. विधानभवनात जातांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलक आमदरांसोबत चर्चा करुन संबंधीत विभागास त्वरीत निर्देश देण्याचे आश्वासन दिले.