साईनाथ विविध कार्यकारी सोसायटी वाखारी निवडणुकीत तिन जागा बिनविरोध तर दहा जागेसाठी उमेदवार रिंगणात
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे
देवळा तालुक्यातील वाखारी येथील साईनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित सन २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक निवडणुकीत वाखारी येथील श्री शांताराम भाऊराव ठाकरे यांची ओबीसी इतर मागासवर्गीय प्रवर्गातून बिनविरोध निवड झाली असून महिला राखीव प्रतिनिधी जागेसाठी सौ योगिता सुभाष चव्हाण व सौ प्रतिभा विलास आहेर यांची बिनविरोध निवड झाली आहे उर्वरीत पुरुष सर्वसाधारण जागेसाठी निवडणूक लागली असुन नऊ उमेदवार रिंगणात आहेत पैकीं आठ जागेसाठी निवडणूक होत आहे तसेच भटक्या विमुक्त एक जागेसाठी निवडणूक लागली आहे दोन उमेदवार रिंगणात आहेत मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत अशा एकूण दहा जागेसाठी निवडणूक लागली आहे तिन जागा बिनविरोध झाल्या आहेत बिनविरोध निवडणूकीसाठी वाखारी गावातील ग्रामस्थांनी भरपूर प्रयत्न केले परंतु शेवटी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे येत्या १८ तारखेला निवडणूक होणार आहे