Type Here to Get Search Results !

ज्ञानपीठ प्रतिष्ठानतर्फे महिला दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय जर्नलचे प्रकाशन



ज्ञानपीठ प्रतिष्ठानतर्फे महिला दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय जर्नलचे प्रकाशन


नंदुरबार- येथील ज्ञानपीठ प्रतिष्ठान आणि महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जर्नल ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट या जर्नलचे प्रकाशन करण्यात आले.


 नंदुरबार येथील ज्ञानपीठ प्रतिष्ठानतर्फे जर्नल ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट या आंतरराष्ट्रीय जर्नलचे प्रकाशन महिला महाविद्यालय, नंदुरबार येथे करण्यात आले. या जर्नलचे संपादन डाँ.मधुकर देसले, डाँ.सुनिल कुवर, डाँ.चद्रशेखर मालविय यांनी केले असुन या जर्नलचे मुद्रण ज्ञानपीठ प्रतिष्ठानचे चेअरमन योगेश्वर जळगावकर यांनी केले आहे. यात देशभरातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी, विचारवंत यांच्या चे शोध निबंधाचा समावेश आहे.या प्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी. एस. पाटील होते. 

तर प्रमुख पाहुणे म्हणून ट्रायबल एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका प्रा.सौ. संगीता वसावे, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी प्रा. डॉ. सोनल मोरे, नेट व सेट परीक्षा उत्तीर्ण कु. मीना कौसर , पोलीस विभागातील हेड कॉन्स्टेबल रिबीका नाईक , मालती वळवी, ज्ञानपीठ प्रतिष्ठानचे चेअरमन योगेश्वर जळगावकर, संचालक महादू हिरणवाळे आदी उपस्थित होते. 


अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. डी. एस. पाटील यांनी सांगितले की, या जर्नलच्या माध्यमातून नंदुरबारसह राज्य आणि देशातील विविध तज्ञ प्राध्यापकांच्या शोध निबंधाचे अवलोकन होणार आहे. ज्ञानपीठ प्रतिष्ठानचा उपक्रम अभिनंदनीय असून नवसंशोधक पीएच.डी. विद्यार्थ्यांना देखील उपयोगी पडणार आहे. असा विश्वास व्यक्त केला.

प्रास्ताविक प्रा. डॉ. मधुकर देसले यांनी केले, सूत्र संचालन प्रा.डॉ. एस.एच. झैदी यांनी केले तर प्रा.डॉ. सुनील कुवर यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad