Type Here to Get Search Results !

उपसभापती प्रदिप वाघ उपोषणावर ठाम पहिल्या दिवशी तोडगा नाहीच



उपसभापती प्रदिप वाघ उपोषणावर ठाम पहिल्या दिवशी तोडगा नाहीच


,विविध पक्ष,संघटना,पत्रकार,ग्रामपंचायतीचा जाहीर पाठींबा

मोखाडा :सौरभ कामडी 

                 मोखाडा तालुक्यातील आधारकार्ड केंद्र जातीचे दाखले पाणीपुरवठा योजना रस्त्यांची झालेली वाताहात तसेच कुपोषण आणि बालमृत्यूमुळे कुप्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील आरोग्य केंद्राची पदे भरावीत कुर्लोद सारख्या दुर्गम ठीकाणी गेल्या कित्येक वर्षांपासूनची आरोग्य केंद्राची मागणी अद्याप पुर्ण होत नसल्यामुळे ती पुर्ण व्हावी खोडाळा आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा अशा विविध मागण्यांसाठी मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती प्रदिप वाघ यांनी उपोषणाचे हत्यार उपसले असून मोखाडा पंचायत समिती समोरच उपोषण सुरू केल्याने संबंधित विभागाची धावपळ वाढली आहे.तालुक्यातील चास गोमघर धामणशेत सावर्डे येथील पाणीपुरवठा योजना पुर्ण करण्याचे आश्वासन याआधीच्या उपोषणावेळीच म्हणजे २०२० ला दिलेले असतानाही आज २०२३ साल सुरू होवूनही त्या योजना अपुर्णच असल्याने नुसत्या आश्वासनावर नाही तर ठोस कार्यवाही आणि कारवाई व्हावी अशी मागणी वाघ यांनी अधिकारी वर्गांच्या चर्चेत केल्याने उपोषणाच्या पहिल्या दिवशी यावर तोडगा निघालाच नाही.यामुळे अधिकारी वर्गाची पंचाईत झाली असून गोमघर,वाकडपाड,करोळ पाचघर,सुर्यमाळ,काष्टी सावर्डे ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यांनीही जाहीर पाठींबा दिला आहे. 

           वाघ यांनी दिलेल्या निवेदनात सांगितले आहे कि भर उन्हाळ्यात दुरुस्तीच्या नावाखाली सायदे धरणाचे पाणी सोडून दिले आहे याउलट दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू असून यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे यामुळे सायदे धरणाचे दुरुस्तीचे काम पुर्ण करून दोषींवर कारवाई करावी, मोखाडा तालुक्यातील चास गोमघर धामणशेत कारेगांव या पाणीपुरवठा योजनाची कामे दोन ते तीन वर्षांपासून सुरू असून या अद्याप ग्रामपंचायतीनी ताब्यात घेतलेल्या नाहीत यामुळे ताब्यात घ्यायच्या आधीच या योजना नादुरुस्त ठरल्या आहेत मात्र संबधित ठेकेदाराना बीले देण्यात आल्याने लोकांना पाण्यापासून वंचीत ठेवणाऱ्या ठेकेदार आणि अधिकारी वर कारवाई व्हावी तसेच या योजना पुर्ण कराव्यात आणि या योजनेचे काम केलेल्या ठेकेदारावर कारवाई व्हावी अशीही मागणी यानिवेदनात करण्यात आली आहे,या प्रमाणे तालुक्यातील खोदलेले रस्ते पुर्वरत करून मिळावेत तसेच शालेय कामकाजासाठी लागणाऱ्या विविध दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात यामुळे शालेय विद्यार्थ्यांना जातीचे दाखले व ईतर दाखले शाळेतच वाटप व्हावे.

        सर्वात महत्वाचा विषय म्हणजे मोखाडा तालुक्यातील खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रावर जवळपास अर्ध्या तालुक्यातील लोकांचे आरोग्य अवलंबून आहे मात्र येथे सुविधाची वाणवा असून हे आरोग्य केंद्र केवळ रेफर केंद्र बनून राहीले आहे यामुळे या केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा अशी मागणी वाघ यांनी केली आहे तसेच खोडाळ्यात आधारकेंद्र सुरू करावे कुर्लोद आरोग्य केंद्राचे काम लवकरात लवकर चालू करावे आरोग्य विभागाची पदे तात्काळ भरावीत सुर्यमाळ येथील वैद्यकीय अधिकारी यांचे पद भरावे या मागण्यांच्या पुर्तेतेसाठी जीव गेला तरी बेहत्तर मात्र आता माघार नाही असे ठाम मत वाघ यांनी व्यक्त केले आहे यावेळी मोखाडा तालुका पत्रकार संघ,मोखाडा तालुका वंचित आघाडी,आरपीआय आठवले गट मोखाडा तसेच सर्व सामान्य आणि सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी या उपोषणास पाठींबा दिला आहे.यामुळे यावर आता काय तोडगा निघतो हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad