Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 17 व्या वर्धापन दिना निमित्त तळोदा उपजिल्हा रूग्णालयात रूग्णांना फळ वाटप



महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 17 व्या वर्धापन दिना निमित्त तळोदा उपजिल्हा रूग्णालयात रूग्णांना फळ वाटप


तळोदा- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त तळोदा उपजिल्हा रूग्णालयात तळोदा तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.


गरीब आणि गरजूंना नेहमी मदतीचा हात देण्यासाठी प्रत्येक मनसे कार्यकर्त्याने तत्पर रहावे, या राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना समोर ठेवीत आज येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना तळोदाच्यावतीने येथील उपजिल्हा रूग्णालयात फळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी मनसेचे तालुकाध्यक्ष विपुल राणे, शहराध्यक्ष सुधाकर माळी, शहर उपाध्यक्ष किरण माळी यांच्या हस्ते रूग्णांना फळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी मनसेचे मयुर महाले, शुभम कर्णकार, सुनिल कोळी, प्रभाकर पाडवी, राहुल गुरव, विवेकानंद महाले, धिरज सूर्यवंशी, भरत सुर्यवंशी, पुष्पेंद्र मराठे, निशांत बत्तीसे, मोग्या पाडवी तसेच वैद्यकीय अधिकारी गणेश पवार, प्रतिक बैसाणे, परिचारिका श्रीमती पाडवी, औषध निर्माता गौतम वळवी आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad