Type Here to Get Search Results !

शारदा नगरमधील नर्मदेश्वर महादेव मंदिरात आज मूर्ती प्राणप्रतिष्ठेसह महाप्रसाद



शारदा नगरमधील नर्मदेश्वर महादेव मंदिरात आज मूर्ती प्राणप्रतिष्ठेसह महाप्रसाद


नंदुरबार शहरातील धुळे शहादा वळण रस्त्यावरील शारदानगर भागात नर्मदेश्वर महादेव मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे.आज शुक्रवार दि. 10 मार्च रोजी या मंदिरात शिवलिंग, नंदी, गणेश आणि हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.दरम्यान नर्मदेश्वर महादेव मंदिर प्रतिष्ठापनानिमित्त आयोजित महाप्रसाद भंडाऱ्याचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन शारदानगर भक्त परिवाराने केले आहे.




शहरातील शारदा नगर भागातील भाविकांच्या लोक वर्गणीतून सभामंडपासह मंदिर उभारण्यात आले आहे.या मंदिरात शिवलिंग, नंदी, गणेश मूर्ती आणि हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे.तत्पूर्वी गुरुवारी सकाळी वाघेश्वरी नगर भागातील सेवानिवृत्त सहाय्यक गटविकास अधिकारी बी.डी. गोसावी यांच्या मातोश्री निवासस्थानापासून मूर्तींची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली..यावेळीा परिसरातील भाविकांकडून ठिकठिकाणी आकर्षक रांगोळी काढून स्वागत करण्यात आले.मिरवणुकीत पारंपरिक पद्धतीने कलशधारी बालिका आणि सुहासिनी महिलांनी सहभाग नोंदविला.




भक्ती गीतांच्या तालावर महिलांनी मिरवणुकीत लक्ष वेधले.गुरुवारी सकाळी जलदधिवास, अचलमूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम झाले. ब्रह्मवृंद आणि पुरोहितांच्या साक्षीने आठ जोडप्यांनी होम पूजनात सहभागी नोंदविला.

दरम्यान आज शुक्रवार दि. 10 मार्च रोजी शारदा नगर भागातील नर्मदेश्वर महादेव मंदिर मूर्ति प्रांण प्रतिष्ठान निमित्त विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यात धान्यधिवास, मूर्तीसाठी न्यास कार्य दुपारी बारा वाजता प्रांत प्रतिष्ठा प्रत्यारोपण संस्कार, ध्वजारोहण, कलश स्थापना, उत्तरांग हवन,बलिदान, पूर्णाहुती, तसेच दुपारी एक वाजता आरती आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याची आवाहन शारदानगर भागातील नर्मदेश्वर महादेव भक्त परिवाराने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad