Type Here to Get Search Results !

दुर्गम तिनसमाळ आदिवासी संग्राहलयाचे वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठी हानी



दुर्गम तिनसमाळ आदिवासी संग्राहलयाचे वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठी हानी



धडगाव- तालुक्यातील दुर्गम भागात तिनसमाळ येथे अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे आदिवासी संग्रहालयाचे अतोनात नुकसान झाले. 




महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे जोहार आदिवासी संग्रहालय म्हणून प्रसिद्ध असलेले संग्रहालय वादळी वाऱ्यामुळे संग्रहालयाचे छप्पर पडून नुकसान झाले आहे. वस्तूची तुटफुट होऊन पाण्याने खराब होऊन नुकसान झाले आदिवासी पारंपरिक वाद्य, पेहरावातील साहित्य, जुने साहित्य ,भांडी, जुन्या नाणी, फोटो, कपडे, हत्यारे, बी-बियाणे आदि वस्तू या संग्रहालयात होते. आदिवासी अस्तित्व, अस्मिता व आत्मसन्मानासाठी हे संग्रहालय सातपुड्यात तयार केले असून आज पर्यंत सहा हजार लोकांची भेट या संग्रहालयात नोंद आहे.




आदिवासी संग्रहालय हे आदिवासींच्या संस्कृती चे अस्तित्व दर्शविते तर नवं अभ्यासकांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या संग्रहालयाचा वादळी वारा पावसामुळे हानी होऊन साहित्य खराब झाले आहे. हे संग्रहालय उभे करण्यासाठी तिनसमाळ येथिल गावकऱ्यांनी तब्बल नऊ महिने कसरत केली. ते आज त्या मेहनतीवर पाणी फिरले. आज जल, जंगल, जमीन जैवविविधता वाढावी. आदिवासी आणि निसर्ग यांच्यातील नातं या परिसरात दिसून येत होता. मात्र आता संग्रहालयातील दुर्मिळ वस्तू खराब झाल्या आहे. तसेच काही वस्तू वाऱ्याने उडून घाटात पडले. समाजातील अश्या संग्रहालयाचा आज देशात विशेष असे महत्व होते. ते या आपत्तीमुळे नाहीसा झाले. संग्रहालय दुरुस्ती व नवीन वस्तू तयार करण्यास लाखाचा रुपया खर्च होणार अशी भीती संग्रहालयाचे संचालक लक्ष्मण पावरा यांनी व्यक्त केली. पुन्हा संग्रहालय दुरुस्ती व उभें करण्यास श्री पावरा धावपळ करत आहे. आदिवासी विकास विभागाने दुर्मिळ साहित्य व संग्राहलयासाठी अनुदान उपलब्ध करावे अशी मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad