कळमेश्वर तालुक्यातील विविध ग्रामपंचायत मध्ये, आयुष्यमान भारत, आणि Maha-DBT शिबिरांचे आयोजन.
कळमेश्वर तालुका: कळमेश्वर तालुक्यातील लिंगा,उपरवाही,लोहगड,खापरी,मडासावंगी,विविध ग्रामपंचायत मध्ये आयुष्यमान भारत आणि महाडिबीटी शेतकरी बांधवांसाठी शिबिर आयोजित करण्यात आले. विविध ग्रामपंचायत मध्ये हक्कदर्शक कंपनी आणि जे.एस.डब्ल्यू. फाउंडेशन व कृषी विभाग कळमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर घेण्यात आले. शिबिरांर्तगत पिएम किसान ई-केवायसी, महाडिबीटी,पेंशन स्किम, आयुष्यमान भारत,सोबतच इतर योजना ज्यांना-ज्यांना लागू पडत आहेत त्यांनाही त्या-त्या योजनेचा लाभ देण्यासाठी अर्ज भरण्यात आले.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना योजनांचा माहितीअभावी आणि कागदपत्रांची पुर्तता होत नसल्याने या योजनांचा लाभ घेता येत नव्हता. त्यासाठी हे शिबिर घेण्यात आले. जेणे करून ग्रामीण भागातील नागरिक हा शासकीय योजनापासून वंचित राहू नये यासाठी हे शिबिर घेण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायत सरपंच,सदस्य, कृषी अधिकारी, तांबेकर सर, हक्कदर्शकचे प्रकल्प अधिकारी, संदीप कांबळे, सहकारी अंकुश गोटमारे, वैशाली ताई, पोर्णिमा दहेनकर, शितल ताई,उपस्थित होते.