Type Here to Get Search Results !

श्रीमत देवी भागवत कथा तथा ज्ञानयज्ञ सप्ताह सांगता.



श्रीमत देवी भागवत कथा तथा ज्ञानयज्ञ सप्ताह सांगता.           

  

ढाणकी प्रतिनिधी दिगांबर शिरडकर

हिंदू नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्रीमद् देवी भागवत कथा तथा ज्ञान यज्ञ सोहळा ढाणकी येथील श्री जगदंबा देवी मंदिर (बोर्डिंग) , श्री धरानंद स्वामी सरस्वती( श्री स्वामी पेंडसे गुरु ) मंदिर येथे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यात भागवतकार ह. भ. प. राजेंद्र महाराज गुंजकर माजलगाव यांच्या सुमधुर रसाळ वाणीतून भागवताचा रसिकांना लाभ मिळाला. सप्ताहात काकडा भजन व पूजा सकाळी ४ ते ६, संहिता पारायण व देवदेवता अभिषेक ७ ते १०, भागवत १ ते ५, हरिपाठ सायंकाळी ६ ते ७, भजन रात्री ८ ते १० याप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गावातील श्री दत्त भजनी मंडळ,श्रीकृष्ण महिला भजनी मंडळ, श्री मार्कंडे महिला भजनी मंडळ, टेंभेश्वर नगर भजनी मंडळ, सत्संग भजनी मंडळ, व परत सत्संग भजनी मंडळ सर्व भजनी मंडळ ढाणकी येथील सहभागी होते. व दिनांक२८ /०३/२०२३ मंगळवारला भव्य दिव्य अशी गावातून शोभायात्रा काढण्यात आली होती. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, देवा दत्ता दत्ता, देवा दत्ता दत्ता, अशा नामस्मरनाणे व टाळ मृदंगाच्या गजराने ढाणकी नगरी दुमदुमून निघाली. व लागलीच ह. भ.प. श्री राजेंद्र महाराज गुंजकर माजलगाव यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले. व तदनंतर महाप्रसादास सुरुवात झाली. सप्ताहाचे आयोजन सुरेश नारायण जयस्वाल नगराध्यक्ष ढाणकी व समस्त गावकरी मंडळ ढाणकी यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad