Type Here to Get Search Results !

सोलापूर | अखेर घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगारास पोलिसांनी केले जेरबंद



सोलापूर | अखेर घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगारास पोलिसांनी केले जेरबंद


फिर्यादी गणेश चंद्रमोहन भुमकर (वय वर्षे ३५), राहणार पुर्व मंगळवार पेठ, सोलापूर यांचे महेश ट्रेडर्स या नांवाचे दुकान फोडून कोणीतरी अज्ञात चोरटयांने त्यांच्या दुकानातुन ३१ हजार रुपये रोख रक्कम चोरुन नेले होते. सदर गुन्हयाचा तपास एस. ए. पवार हे करीत होते. सदर गुन्हयातील पाहिजे असलेला आरोपी विनायक दत्तात्रय नारबंडी (वय वर्षे २५), रा. जोडभावी पेठ, सोलापूर हा रुपाभवानी चौकात थांबलेला आहे असे विश्वसनिय बातमी मिळाल्यांने जोडभावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांच्या आदेशाने डी. बी.पथकातील पोलीस हवालदार पवार, पोलीस हवालदार आरेनवरु, पोलीस नाईक शिवशरण, पोलीस नाईक बाबर, पोलीस नाईक गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल कसगावडे, पोलीस कॉन्स्टेबल घोगरे असे रुपाभवानी चौकात जावून गराडा घालुन शिताफीने आरोपीला पकडले. कौशल्यांने तपास केले असता आरोपीने तीन विविध ठिकाणी घरफोडी केले बाबत कबुली दिली.त्याच्याकडून एकुण ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 

सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस उप आयुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहायक पोलीस आयुक्त विभाग १ संतोष गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त विभाग २ माधव रेडडी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली जोडभावी पेठ पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सपोनि व्हि. एच. पवार, पोलीस हवालदार श्रीकांत पवार, पोलीस हवालदार खाजप्पा आरेनवरु, पोलीस नाईक भारत गायकवाड, पोलीस नाईक शीतल शिवशरण, पोलीस नाईक सचिन बाबर, पोलीस कॉंन्स्टेबल स्वप्नील कसगावडे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश घोगरे, पोलीस कॉन्स्टेबल सतीश माने यांनी पार पाडली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad