Type Here to Get Search Results !

माळशिरस | राष्ट्रवादीच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष वर विनयभंगाचा गुन्हा दाखल



माळशिरस | राष्ट्रवादीच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष वर विनयभंगाचा गुन्हा दाखल


सुमित्रा नगर यशवंत नगर तालुका माळशिरस येथे भाड्याने राहत असलेल्या महिलेचा तिच्या घरात घुसून विनयभंग केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अंबादास ओरसे यांच्यासह चौघांवर भादवि 323, 354, 452, 504, 506, 43 प्रमाणे अकलूज पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक 35 वर्षीय तरुणी सुमित्रा नगर येथे तिच्या कुटुंबासह भाड्याने राहत आहे दिनांक 24 मार्च 2023 रोजी सायंकाळी सात वाजता तिच्या घराजवळ काही व्यक्ती तिच्या घरमालकाला मारहाण व शिवीगाळ करत असताना तिला दिसले तिने खाली येऊन का मारता त्याची काय चूक आहे असे विचारले असता अंबादास ओरसे व त्यांच्या मुलाने महिलेला धक्काबुक्की शिवीगाळ केली मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सोलापूर जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे पोलीस माझे काहीच करू शकत नाहीत तू आमच्या नादाला लागू नको असे म्हणत तिला लाथा बुक्यांनी मारहाणही केली, महिला जास्त आरडाओरडा करू लागताच अंबादास ओरसे त्याचा मुलगा व अन्य दोघे चार चाकी गाडीतून पळून गेले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad