सतत बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या कांदा व ईतर पिकांना धोका
आंबेगाव | या वर्षात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा पीक घेतले आहे, मात्र कमी बाजारभावाने तो नाराज आहे, त्यातच बदलत्या वातावरणात पिकांवर रोगराईच्या शक्यतेने तो पुरता घाबरलेला आहे. तालुक्यात हजारो एकरांवर कांदा लागवड आहे. नाशिक कांद्याचे प्रमाण मोठे आहे. पीक चांगले आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत बदलेले वातावरण, वादळी पाऊस, तर खराब वातावरणामुळे कांदापातीच्या शेंड्याला पांढरेपणा दिसू लागला आहे. पाऊस, खराब आणि ढगाळ हवामान टिकले, तर कांद्यांवर करपा रोगाची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतित झाला आहे.
कांदा पिकाला एकरी 30 ते 25 हजार रुपये खर्च येतो. सध्या 10 ते 12 रुपये प्रतिकिलो बाजारभाव झालेला आहे , बाजारात मात्र कांदा वीस रुपये प्रतिकिलोने विकत आहे. आंबेगाव पूर्व, सातगाव पठार भागात आरणीसाठी (बराखी) लागणारा प्लास्टिक कागद खरेदी केला आहे. अनेक ठिकाणी कांदा काढणी सुरु आहे. मजूर तुटवडा असल्याने मजुरांना मजुरी 250 ते 300 रुपये द्यावे लागत आहेत. फवारणीसाठीही मोठा खर्च येत आहे, असे शेतकऱ्यांचे सांगणे आहे . कांदा पंचवीस ते तीस रुपये झाल्यास शेतकरी समाधानी होऊ शकेल.
प्रतिनिधी - आकाश भालेराव
आंबेगाव