मरडसगाव फाटा -राजुर रस्ता काम पूर्ततेसाठी तहसीलदारांना निवेदन
गंगाखेड प्रतिनिधी.
मरडसगावं फाटा ते राजूर रस्त्याचे सुरू असलेले नूतनीकरणाचे काम तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील ग्रामस्थांनी बुधवारी गंगाखेड तहसीलदाराकडे केली.
मरडसगाव फाटा ते राजुर पर्यंत गोपा , नरलद ,रोकडेवाडी ही गावी येतात .या गावातील लोकांना दररोज गंगाखेड , परभणी जाण्यासाठी या मार्गाने जावे लागते. मागील एक ते दीड महिन्यापासून या गावाला जोडणारा रस्ता जेसीबीच्या साह्याने नूतनीकरण करण्याच्या नावाखाली खोदून ठेवला आहे. रस्त्याचे खोद काम केल्यानंतर नवीन रस्ता करण्याचे काम ठप्प आहे. पण हा रस्ता खोदून ठेवल्यामुळे या भागातील लोकांना ये जा करण्यासाठी खूप त्रास होत आहे .काही दुचाकीस्वार, सायकलवरील विद्यार्थी पडत आहेत. अंधारात प्रवास करणे फार धोक्याचे बनले आहे. या सर्व बाबीला कंटाळून है काम पूर्ण करावे या मागणीसाठी आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या उपस्थितीत या भागातील ग्रामस्थांनी गंगाखेड तहसीलदारांना बुधवारी निवेदन दिले. या रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करून ग्रामस्थांच्या अडचणी सोडवाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या निवेदनावर सखाराम बोबडे पडेगावकर,बालासाहेब विठ्ठलराव सांगुळे, निलेश घोरबांड ,पिंटू घोरबांड, बालासाहेब शिंदे, केशव घोरबाड, गोविंद दुधाटे, बाळाबुवा गिरी आदींच्या स्वाक्षरी आहेत.