साकुर येथे जिजाऊ महिला बचतगट साकुर मार्फत हळदीकुंकू कार्यक्रम व 85 वर्षाच्या वृद्ध महिलांचा वटीभरून केला सत्कार.
जव्हार - दिनेश आंबेकर.
जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत साकुर येथील साकुर गावातील समाज मंदिरात महिला मंडळीने हळदी कुंकू, भाषण स्पर्धा, संगीत खुर्ची, गायन स्पर्धा, ब्लाऊज पीस, संगीत डब्बी, शाल श्रीफळ व फूले, नाष्ट्या करता फराळ असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी कर्यक्रमासाठी प्रमुख पावणे म्हणून जि.प. शाळा साकुर तुंबडा, जेष्ठ नागरिक देवराम भडांगे, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील समाज सेवक प्रमोद मौळे उपस्थित होते.
कर्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिजाऊ महिला बचतगट सुली देवराम भाडंगे होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ८५ वर्षाच्या वृद्ध महिलांचा वटीभरून सत्कार केला व सदर वृद्धला कोणीच नसल्याने सर्व महिलांनी हळदी कुंकू समारंभ मध्ये आजीचा वाटीभरून सत्कार केल्यानी वातावरण आनंदीमय झाले आहे.
तसेच सर्व महिलांना ग्रामपंचायत मार्फत असलेल्या विविध योजना व महिलांचे हक्क आणि अधिकार, महिला ग्रामसभेचे महत्व, महिला सक्षमीकरण विषयी ग्रामपंचायत मधील अधिकाराची माहिती व त्यानंतर महिलांना आपले विविध प्रश्न व समस्या मांडल्या त्यामध्ये गाव स्वछता अभियान, सांडपाणी सोय, महिलांना कपडे धुण्यासाठी धोबी घाट बांधणे, दिवाबत्तीची सोय करणे, व्यसनमुक्त गाव करणे, महिला मीटिंग साठी सभागृह बांधणी करणे इत्यादी कामाची स्वरूप महिलांनी या कार्यक्रमात जाणून घेतले.
याबाबत ग्रामपंचायतचे व गावातील महिलांच्या सर्व समस्या ग्रामपंचायत मार्फत नक्कीच सोडवण्यासाठी महिला प्रयत्न करू व महिलांनी केलेल्या मागण्यांसाठी ग्रामपंचायत विकास आराखडा मध्ये घेऊन मूलभूत सोईसुविधा तसेच महिलांना मार्गदर्शन करतांना ग्रामपंचायत मार्फत महिलांनसाठी खर्च करता येणाऱ्या १०% निधी बाबत माहिती ही समाज सेवक प्रमोद मौळे यांनी सर्व महिलांना देऊन खूप मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच त्यानंतर जिजाऊ महिला बचत गट अध्यक्ष यांनी सर्व महिलांना आव्हान केले की घरपट्टी वसुली पाणी पट्टी वसुली याबाबत सर्वांनी वेळेवर कर भरावा असे ही पटवून सांगितले त्याच बरोबर विविध शासकीय योजना बाबत माहिती दिली. जिजाऊ महिला बचत गट साकुर, उप अध्यक्ष किशोरी अक्षय भडांगे यांनी यावेळी गावातीलजे शेतकरी महिलांना रोजगारा करता कुटीर उद्योग करणार असल्याची माहिती दिली.
त्यानंतर उपस्थित सर्व महिलांना हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला व त्यामध्ये प्रत्येक उपस्थित महिलांना एक ब्लाऊज पीस कुंकू डब्बी व भेट, फराळभेट देण्यात आली. यावेळी साकुर गावातील तरुण युवा अक्षय भडांगे व भरत गवळी यांनी खूप मेहनत घेतली.
यावेळी कर्यक्रमा साठी प्रमुख पाहुणे म्हणून जि. प शाळा साकुर तुंबडा जेष्ठ नागरिक देवराम भडांगे,समाजसेवक प्रमोद मौळे, उप अध्यक्ष किशोरी अक्षय भडांगे, सचिव रेखा महिंद्र लोखंडे, सहकारी शालू रामचंद्र ओलंबा, सहकारी चांगुना एकनाथ वातास, भारती केशव वाढू इत्यादी जवळ पास ६० ते ७० महिला भगिनी मोठ्या संख्येने हळदी कुंकू समारंभ कार्यक्रमा साठी उपस्थित होत्या व भारती केशव वाढू यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे व ग्रामस्तानचे तसेच सर्व गावातील महिलांचे आभार मनून कार्यक्रमाची सांगता झाली व कार्यक्रम संपन्न झाला.