जुनी सेवानिवृत्ती योजना लागू करावी या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संप
राज्य शासनाने जुनी सेवानिवृत्ती योजना तात्काळ लागू करावी, या मागणीसाठी दि. १४ रोजी आंबेगाव तालुक्यातील सरकारी, निमसरकारी आरोग्य विभाग, शाळा, उपविभागीय कार्यालय जुन्नर आंबेगाव, तहसिलदार - कार्यालयांतील कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. हा संप असल्याचे बहुतेक नागरिकांना माहिती नसल्याने ज्यांची कामे संबंधित कार्यालयांत होती त्यांना या संपामुळे आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.
सरकारी कर्मचान्यांच्या या संपाला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेच्या आंबेगाव तालुका युवती अधिकारी डॉ. निलम गावडे, माधुरी अंकुश यांनी पाठींबा दिला. तहसिल कार्यालय घोडेगाव, आंबेगाव पंचायत समिती कार्यालय घोडेगाव, आदिवासी प्रकल्प कार्यालय घोडेगाव, प्रांत कार्यालय उपविभाग मंचर येथे संबंधित कर्मचाऱ्यांनी जुनी सेवानिवृत्ती योजना त्वरीत सुरू करावी या मागणीसाठी आपल्या कार्यालयांबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी दामुराजे असवले, डी. एन. शेळकंदे, महेश बढे,
ज्ञानेश्वर उभे, जयश्री भवारी, शुभांगी भिंगोरे, एम. डी. दाभाडे, योगेश खंडारे, नवनाथ भवारी, अलका खोसे, सिध्देश्वर गुंजकर, शंकर काळे, आर. आर. नलावडे, डी. बी. उगले, सागर हगवणे, दिपक हरण, दामोदर टेमगिरे, एस. डी. अहीरे, एस. बी. शेवाळे, अनुप कवाणे, राजाराम काथेर, कपिल कांबळे, दिपक गाडीलकर, आर. ए. खैरनार, डी. बी. उगले यांसह विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.
सरकारी कर्मचारी हा आपल्या आयुष्यातील ३० ते ४० वर्षे शासकीय सेवेला देतात. तेंव्हा निवृत्तीनंतर त्याला सामाजिक सुरक्षा मिळावी या हेतूने जुनी पेन्शन योजना त्याकाळी लागू करण्यात आली होती. पण सरकारने ही सुरक्षाच काढून घेतल्याने सर्व कर्मचारी अस्वस्थ आहेत.
कर्मचाऱ्यांचे जिव्हाळयाचे अनेक प्रश्न सरकारने प्रलंबित ठेवले आहेत. याबाबत अनेक निवेदने विविध संघटनांतर्फे दिली. चर्चेची मागणी केली. पण कोणताही अंतिम निर्णय झाला नाही. त्यामुळे संप पुकारल्याशिवाय आमच्याकडे पर्यायच उरला नसल्याचे ज्ञानेश्वर उभे यांनी सांगितले.
प्रतिनिधी - आकाश भालेराव घोडेगाव